• +९१ ९९७५ ८३२८९९

यशोदीप मंगल कार्यालयामध्ये आपले स्वागत आहे.

    सामुहिक विवाह सोहळा : यशोदीप मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक आणि संस्थापक कमिटीद्वारा दरवर्षी सामुहिक विवाह सोहळा आयोगीत करण्यात येतो. मंचर - अवसरी आणि परिसरातील गरजू व गरीब इच्छुक वधू - वरांसाठी फक्त २१०००/- रुपयामध्ये आयोजन केले जाते. यशोदीप मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापन कार्यकारी अधिकारी यांच्या सहकार्यातून मुबलक सेवा आणि सुविधांचे प्रदान केले जाते. ७० ते ८० वधू वर दरवर्षी या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होतात. यशोदीप मंगल कार्यालयाच्या माध्यमातून या सर्व वधू वरांस जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येते.     यशोदीप गार्डनची स्थापना सन २००४ साली श्री. संजयशेठ चव्हाण यांनी केली. दर वर्षी या मंगल कार्यालयामध्ये १०० पेक्षा जास्त विवाह सोहळे पार पडतात. तसेच दर वर्षी या ठिकाणी गरीब आणि परिस्थितीने कमकुवत असलेल्या वधू वरांसाठी कमी खर्चात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. यशोदीप गार्डन हे निसर्गरम्य आणि हवेशीर वातावरणात असुन मोठी जागा उपलब्ध आहे. पुणे जिल्ह्यातील जनतेसाठी लग्न समारंभ, बर्थडे पार्टी, रिसेप्शन पार्टी, मीटिंग इ. चे आयोजन केले जाते. कार्यालयातील सभामंडपाची क्षमता १५०० लोक आरामात बसू शकतील एवढी आहे. पार्किंग, शुध्द पाणी, निसर्गरम्य वातावरण सदैव तत्पर असा स्टाफ इ. सुखसोयींमुळे यशोदीप गार्डन मंचर परिसरात प्रसिद्ध आहे.

    मंगल कार्यालयाचे ठिकाण: अवसरी बुद्रुक, मंचर - शिरूर रोड , मंचर शहरापासून ७ किमी अंतरावर , आणि पुणे - नाशिक हायवे पासून ५ किमी अंतरावर निसर्गरम्य वातावरणात आहे. दुचाकी आणि चारचाकी साठी पुरेशी पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे. पुणे आणि इतर परिसरातून येथे येण्यासाठी खूप कमी वेळ व अंतर लागते.
     यशोदीप गार्डनची क्षमता अधिक लोक बसण्याची असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन करण्यास काही अडचण येत नाही, त्यमुळे याठिकाणी दिवसा आणि रात्रीसुध्दा कार्यक्रमाचे नियोजन करता येते .

Turnkey व्यवस्थापन: आम्ही Turnkey व्यवस्थापनाचे प्रदान करतो. सजावट, बैठक व्यवस्था, जेवणाची सुविधा, शुद्ध पाणी, फोटोग्राफी, वधू - वरांसाठी स्वतंत्र खोली व आणखी बरेच काही . आम्ही आपल्या शुभारंभाचे आनंदाचे क्षण विस्मरणीय ठेवण्यासाठी प्रयत्न करतो.
केटरिंग: आम्ही आपल्याला हव्या असलेल्या चवीमध्ये पंजाबी, महाराष्ट्रीयन, गुजराथी, बंगाली, उत्तर भारतीय किंवा दक्षिण भारतीय अन्नपदार्थ तज्ञ आचाऱ्याकडून बनवून आपल्या कार्यक्रमात पुरवतो. आम्ही सर्व डिशेश आणि भांडी प्रदान करतो. आमच्या जेवण कक्षाची १५०० लोकांना अन्न पुरवण्याची क्षमता आहे.

आमच्या सेवा आणि सुविधा:-
स्वतंत्र कक्ष : यशोदीप गार्डनमध्ये स्वतंत्र हॉल आहेत लग्न हॉल आणि जेवणाचे हॉल मध्ये विभागलेले आहे. लग्न किंवा रिसेप्शन सोहळा कार्य सहजतेने आणि एक वेळेवर आणि सुव्यवस्थित रीतीने संपन्न व्हावे यासाठी व्यवस्था केलेली आहे. लवकर खाणे इच्छिणाऱ्या वृद्ध अतिथी आणि इतर काळ सोहळा साजरी करू इच्छित असणाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष आहेत. भोजन झाल्यानंतर आराम करण्यासाठी चारपायीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
स्वतंत्र खोली : यशोदीप गार्डनमध्ये 4 खाजगी खोल्या, वधू आणि वर आणि त्यांच्या कुटुंबियांना वापरासाठी संलग्न स्नानगृह प्रत्येकी आहेत. पुढील समारंभासाठी अवधी असल्यास विश्रांतीसाठी शांत आणि हवेशीर विश्रांती कक्ष आहे .
सजावट आणि देखावा: शुभारंभासाठी आलेल्या अतिथी व इतर नातेवाईकांसाठी आकर्षक आणि मनोरंजणासाठी सजावट आणि देखावा विविध लाईट आणि फुलांचा वापर करून केलेला आहे.
जनरेटर सेवा: लग्न समारंभ चालू असताना जर वीज गेली असेल तर जनरेटर सेवा उपलब्ध आहे.
पार्किंग : यशोदीप गार्डनमध्ये दुचाकी व चारचाकी वाहनास पार्क करण्यासाठी मुबलक जागा आहे.
डायनिंग हॉल : मुख्य अतिथीसाठी यशोदीप गार्डनमध्ये ए.सी. डायनिंग हॉल ची सुविधा आहे.
समारंभाचे भाडे / फी: बुकिंग चार्जेस आणि भाडे पुढीलप्रमाणे आहेत:
रिसेप्शन :- भाडे किंवा फी हि समारंभाच्या मागणी आणि व्यवस्थापनेच्या मागणीनुसार असेल
लग्नसमारंभ :- भाडे किंवा फी हि समारंभाच्या मागणी आणि व्यवस्थापनेच्या मागणीनुसार, जेवणातील मेनू, वेळ, व इतर सुविधांवर आधारित आकारली जाईल.


कार्यकारी वर्ग:श्री संजयशेठ चव्हाण

कार्याध्यक्ष यशोदीप गार्डन .

सौ. आशाताई चव्हाण

संचालिका यशोदीप गार्डन.

श्री दिनेशशेठ चव्हाण

कार्याध्यक्ष दिनेश उद्योग समूह.

फोटो संकलन